वर्ल्ड कप स्टार दीप्ती शर्माला प्रेमानंद महाराजांनी काय केलं मार्गदर्शन?

सकाळ डिजिटल टीम

प्रेमानंद महाराज

मथुरामधील वृंदावन येथे असलेल्या प्रेमानंद महाराजांची आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी भेट घेतली आहे. विराट कोहली तर येथे अनेकदा येत असतो.

Premanand Maharaj

|

Sakal

दीप्ती शर्माने घेतली प्रेमानंद महाराजांची भेट

आता भारताची स्टार महिला अष्टपैलू क्रिकेटपटू दीप्ती शर्मा हिनेही नुकतीच प्रेमानंद महाराजांची भेट घेतली.

Deepti Sharma Visits Premanand Maharaj

|

Sakal

वर्ल्ड कप २०२५ मधील सर्वोत्तम खेळाडू

भारतीय संघाने जिंकलेल्या वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेली दीप्ती नुकतीच श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिका खेळली.

Deepti Sharma

|

Sakal

वृंदावन

या टी२० मालिकेनंतर ती नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वृंदावनला गेली होती.

Deepti Sharma

|

Sakal

खेळाचे महत्त्व

यावेळी प्रेमानंद महाराज आणि तिच्याच खेळाचे महत्त्व आणि खेळाडूच्या आयुष्यात सरावाचे महत्त्व याबाबत चर्चा झाली.

Deepti Sharma

|

Sakal

दुसऱ्यांना आनंद हा परोपकार

प्रेमानंद महाराज दीप्तीला म्हणाले, खेळ असला, तरी एका खेळाडूच्या विजयाने संपूर्ण भारताला आनंद मिळतो. दुसऱ्यांना आनंद देणे हा मोठा परोपकार आहे.

Premanand Maharaj

|

Sakal

यशाबाबत मार्गदर्शन

त्यांनी सांगितले की बऱ्याचदा खेळाडू यशानंतर सरावाला हलक्यात घेतात आणि मनोरंजनाकडे वळतात. पण विजयानंतर अधिक सावधान झालं पाहिजे आणि सरावातील सातत्य आणि दृढता हाच एक मार्ग आहे, ज्यामुळे पुढे जाता येते.

Deepti Sharma

|

Sakal

WPL 2026

दीप्ती आता वूमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत युपी वॉरियर्सकडून खेळताना दिसणार आहे.

Deepti Sharma

|

Sakal

सारा तेंडुलकरचा गोव्यातील 'तो' Photo Viral; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Sara Tendulkar

|

Instagram

येथे क्लिक करा