जंगलातील झाडं तोडल्याने शहरातील तापमानावर काय परिणाम होतो?

Varsha Balhe

तापमानात

जंगलातील झाडं तोडल्यामुळे शहरांमध्ये उष्णता वाढते आणि परिसराचं तापमान अधिक जाणवू लागतं.

Effect of Cutting Trees

|

esakal

गारवा

झाडं पानांमधून पाण्याची वाफ हवेत सोडतात. त्यामुळे परिसर थंड राहतो, पण झाडं तोडल्याने हा नैसर्गिक गारवा कमी होतो.

Effect of Cutting Trees

|

esakal

कार्बन डायऑक्साइड

झाडं हवेतला कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. झाडांची संख्या कमी झाल्याने वातावरणातील या वायूचं प्रमाण वाढण्यास हातभार लागतो.

Effect of Cutting Trees

|

esakal

गरम वाऱ्यांचा परिणाम

झाडांची दाटी गरम वाऱ्यांचा वेग कमी करण्यास मदत करते. झाडं कमी झाल्यावर गरम हवा शहरांपर्यंत सहज पोहोचू शकते.

Effect of Cutting Trees

|

esakal

उष्णता

शहरातील रस्ते, इमारती आणि सिमेंटचे बांधकाम दिवसभरातील उष्णता शोषून घेतात आणि रात्री हळूहळू बाहेर सोडतात.

Effect of Cutting Trees

|

esakal

उष्णतेच्या लाटांचा धोका

झाडं कमी आणि तापमान जास्त असल्यामुळे शहरांमध्ये उष्णतेचा त्रास वाढू शकतो. उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटांचा परिणाम अधिक जाणवतो.

Effect of Cutting Trees

|

esakal

झाडं लावणं का गरजेचं?

शहरातील तापमान कमी ठेवण्यासाठी रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागांमध्ये आणि परिसरात जास्तीत जास्त झाडं लावणं गरजेचं आहे.

Effect of Cutting Trees

|

esakal

लांडगा किती दूरचा आवाज ऐकू शकतो?

wolf hearing distance

|

Sakal

येथे क्लिक करा