सकाळ डिजिटल टीम
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अलीकडेच नोकरीसाठी एक अनोखी संधी जाहीर केली आहे, जिथे उमेदवारांना लेखी परीक्षा न घेता डायरेक्ट नोकरी मिळवता येईल.
डीएमआरसीने मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर चे एकूण ६ पदांसाठी नोकरीची संधी जाहीर केली आहे, ज्यात तीन मॅनेजर आणि तीन असिस्टंट मॅनेजर पदे आहेत.
दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी उमेदवारांनी delhimetrorail.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०२४ आहे.
दिल्ली मेट्रोतील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यालयातील बी.बी.ई / बी. टेक ( सिव्हिल) या शिक्षणाची डिग्री असणे आवश्यक आहे. या डिग्रीत ६० % गुण प्राप्त केलेले असावे.
तसेच, या नोकरीसाठी उमेदवारांचे वय १ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ५५ ते ६२ वयोगटाच्या आत असायला हवे.
मॅनेजर पदासाठी ८७,८०० रुपये दर महिना पगार मिळणार आहे. तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ६८,३०० रुपये पगार मिळणार आहे.
दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी उमेदवाराची निवड हि ऑनलाईन आणि ऑफलाईन मुलाखती नुसार केली जाणार आहे.
दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी उमेदवारांना मेडिकल फिटनेस परीक्षा दयावी लागणार आहे.
दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी मुलखात हि डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी दिल्ली मेट्रोच्या साईटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करा. त्यानंतर हा अर्ज भरून जनरल मॅनेजर, प्रोजेक्ट (एचआर) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन , फायर ब्रिगेड लेन, भारखंभा, नवी दिल्ली येथे अर्ज पाठवावा.
Makka Bhakari : मक्याच्या भाकरीत कोणते व्हिटॅमिन्स असतात? जाणून घ्या