Mughal Monuments Delhi : लाल किल्ल्यापासून जामा मशि‍दीपर्यंत...; दिल्लीत मुघलांनी कोणत्या वास्तू बांधल्या?

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीतील मुघल वास्तू

दिल्ली आणि आग्रा या मुघल साम्राज्याच्या दोन प्रमुख राजधान्या होत्या. त्यामुळे मुघलांनी या दोन्ही ठिकाणी अनेक भव्य आणि ऐतिहासिक इमारती बांधल्या.

Mughal Monuments Delhi

|

esakal

समृद्ध इतिहास

यातून त्यांची कला, वास्तुकला आणि समृद्ध इतिहास झळकतो. चला जाणून घेऊया, दिल्लीत मुघलांनी कोणकोणत्या इमारती उभारल्या.

Mughal Monuments Delhi

|

esakal

जामा मशीद

जामा मशीद ही भारतातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक मानली जाते. शाहजहान याने १६५६ साली या मशिदीचे बांधकाम केले. लाल व पांढऱ्या संगमरवरी दगडात बांधलेली ही मशीद एकाच वेळी सुमारे २५,००० उपासकांना सामावून घेऊ शकते. ही मशीद मुघल वास्तुकलेचे अप्रतिम उदाहरण आहे.

Mughal Monuments Delhi

|

esakal

लाल किल्ला

लाल किल्ला हे दिल्लीतले सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक बांधकाम आहे. शाहजहान याने १६४८ साली या भव्य किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. लाल वाळूच्या दगडात बांधलेला हा किल्ला अनेक वर्षे मुघल सत्तेचे केंद्र राहिला. याच किल्ल्यातून पुढे मुघल राजवटीचा शेवट झाला.

Mughal Monuments Delhi

|

esakal

हुमायूनचा मकबरा

हुमायूनचा मकबरा हा मुघलकालीन स्थापत्यकलेचा आणखी एक सुंदर नमुना आहे. हुमायून यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी हमीदा बानू बेगम यांनी १५६५ साली या मकबऱ्याची निर्मिती केली. हा मकबरा नंतर ताजमहालच्या वास्तूशैलीसाठी प्रेरणास्थान ठरला.

Mughal Monuments Delhi

|

esakal

पुराण किल्ला (जुना किल्ला)

पुराण किल्ला हे हुमायून याने १५३४ साली बांधले. या किल्ल्याला मुघल साम्राज्यात विशेष ऐतिहासिक स्थान आहे. याच ठिकाणी हुमायूनने शेवटचा श्वास घेतला. भव्य दरवाजे आणि मजबूत तटबंदीमुळे हा किल्ला आजही मुघल सामर्थ्याची साक्ष देतो.

Mughal Monuments Delhi

|

esakal

मुघल बाग

मुघलकालीन बागांची परंपरा अत्यंत प्रसिद्ध होती. मुघल बाग, जी सध्या अमृत उद्यान म्हणून ओळखली जाते. ही सुरुवातीला फिरोज शाह तुघलक याने बांधली होती. सध्या ही बाग राष्ट्रपती भवन जवळ असून, दरवर्षी येथे हजारो पर्यटक भेट देतात.

Mughal Monuments Delhi

|

esakal

Best Honeymoon Destinations : जोडप्यांसाठी स्वर्ग! भारतातील 'ही' ठिकाणं हनिमूनला करतील अविस्मरणीय

Best Honeymoon Destinations in India

|

esakal

येथे क्लिक करा...