सकाळ डिजिटल टीम
या पदार्थांमध्ये कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक आणि सेलेनियम यासारखे पौष्टिक घटक असतात, जे हृदयासाठी फायदेशीर ठरतात.
मकरसंक्रांतीचे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. हे पदार्थ पोषणाने भरपूर असतात.
चुरमुरे आणि गुळाचा पाक वापरून गोड लाडू बनवले जातात, जे लहान मुलांना विशेष आवडतात. हे पदार्थ पौष्टिक असून शरीरासाठी उत्तम असतात.
गुळ, तीळ, भाजणीचे चण्याचे पीठ, वेलची पावडर, दाण्याचा कुट, खसखस आणि खोबरे वापरून बनवलेली गुळपोळी ही मकर संक्रांती सणाच्या दिवसात आवडीने बनवली जाते.
शेंगदाणे, गूळ आणि तूप यांचा वापर करून शेंगदाण्याची चिक्की तयार केली जाते. ह्या चिक्कीमध्ये प्रोटीन्स आणि इतर पोषक घटक असतात, जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
पुरणपोळी हा एक लोकप्रिय सणासुदीचा पदार्थ आहे. मकरसंक्रांतीला विशेषत: महाराष्ट्रात पुरणपोळी तयार केली जाते, जो घरातील प्रत्येक सदस्याला आवडतो.
तिळ, सुकं खोबरं, ड्रायफ्रुटस आणि गूळ यांचे सारण तयार करून रवा-बेसन पीठात भरून तळलेली खुसखुशीत करंजी बनवली जाते.