सकाळ डिजिटल टीम
500 ग्रॅम तांदूळ, 500 ग्रॅम जवारी, 250 ग्रॅम चणाडाळ, 125 ग्रॅम उडीद डाळ, 100 ग्रॅम गहु, 1 कप जाड पोहे, 25 ग्रॅम धणे, 2 टेबलस्पून जिरं, 2 टीस्पून मेथी दाणे, 1 टीस्पून बडीशेप.
सर्व साहित्य एक-एक करून गरम करा. अधिक खरपुस न करता भाजा.
सर्व भाजणीचे साहित्य एकत्र करून थंड होण्यासाठी ठेवा.
सर्व साहित्य एकत्र दळून घ्या.
भाजणीचे वडे पीठ तयार आहे. हे पीठ 1 महिना टिकते.
गरम पाणी घालून 1 तास मळून मुरत ठेवा.वडे चिकनसोबत सर्व्ह करा, चव खमंग लागते.
तुम्ही हवं असल्यास, पीठ मळण्यापूर्वी त्यात जरा मसाले, कांदाची पेस्ट किंवा काकडी खिसून टाकू शकता, हवं असेल तर दुसरे पदार्थ घालून चव वाढवू शकता.