ताक कधी अन् किती प्यावे 'हे' जाणून घ्या एका क्लिक वर

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळ्यात

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळवण्यासाठी ताक एक उत्तम पेय आहे. ताकामुळे शरीराला ताजेपणा आणि थंडावा मिळतो, ज्यामुळे आपले शरीर हायड्रेटेड राहते.

Buttermilk | Sakal

ताक

ताकामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम, लोह, फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स, आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीराच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

Buttermilk | Sakal

योग्य वेळ

तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी ताक पिऊ शकता, परंतु ताक पिण्याची योग्य वेळ म्हणजे जेवण केल्यानंतर.

Buttermilk | Sakal

पचनासाठी

ताकामध्ये हेल्दी बॅक्टेरिया आणि लॅक्टिक अॅसिड असतो, जो पचन क्रियेला मदत करतो. त्यामुळे खाल्ल्यानंतर ताक पिणे पचनाच्या दृष्टीने फायदेशीर आहे.

Buttermilk | Sakal

ऊर्जा

खाल्ल्यानंतर ताक पिण्यामुळे अन्न सहजपणे पचते आणि शरीराला अधिक ऊर्जा मिळते. तसेच, पोटाची जळजळ आणि अॅसिडिटी कमी होण्यास मदत होते.

Buttermilk | Sakal

जास्त अन्न

जर तुम्ही जास्त अन्न खाल्ले असेल, तर ताक पिणे रामबाण उपाय ठरते. ताकामुळे अन्न लवकर पचते.

Buttermilk | Sakal

किती प्यावे?

तुम्ही एक दिवसात एक ग्लास ताक पिऊ शकता. पण त्यापेक्षा जास्त ताक पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Buttermilk | Sakal

उन्हाळ्यात दलिया खाल्याने काय होईल?

Dalia | Sakal
येथे क्लिक करा