Monika Shinde
डेंग्यू आणि मलेरिया दोन्ही मच्छरांमुळे होणारे घातक आजार आहेत. परंतु, ही दोन वेगवेगळी समस्या आहेत, ज्यांच्या कारणांपासून ते लक्षणे आणि उपचारांपर्यंत सर्वकाही वेगळं आहे.
डेंग्यू हे एक विषाणूजन्य आजार आहे जो एडीस मच्छरमुळे पसरतो. उच्च तापमान, शरीराच्या वेदना, मसल्स पेन, लाल रॅशेस याचे मुख्य लक्षण दिसून येतात.
मलेरिया हा एक परजीवीजन्य आजार आहे, जो अॅनोफिलीज मच्छरमुळे पसरतो. थंडी भरून ताप येणे, मळमळ आणि उलटी, डोकेदुखी होणे असेल याचे मुख्य लक्षण आहेत.
डेंग्यूमुळे प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होते.
डेंग्यू तापामुळे अनेकांचा रक्तदाब कमी होतो.
डेंग्यूमुळे उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होतो. डेंग्यूचा यकृतावरही परिणाम होतो.