पौगंडावस्थेतील नैराश्य, करु नका दुर्लक्ष..

Sudesh

नैराश्य

किशोरवयीन तरुण-तरुणींमध्ये नैराश्याची काही विशेष लक्षणं दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

Depression in Teens | eSakal

मार्क

नैराश्याचं मुख्य लक्षण म्हणजे हुशार विद्यार्थ्याचे मार्क अचानक कमी होणं. शाळा/कॉलेजमध्ये दुर्लक्ष होऊ लागणं.

Depression in Teens | eSakal

घरातून पळून जाणं

कित्येक किशोरवयीन मुलं ही घरातून पळून जाण्याची भाषा सुरू करतात. काही जण यासाठी प्रयत्नही करतात.

Depression in Teens | eSakal

खाण्याच्या सवयी

नैराश्यामुळे खाण्याच्या सवयींमध्ये बदल दिसतो. अती खाणं, किंवा अचानक कमी खाणं आणि गरज नसताना खात राहणं अशा सवयी दिसतात.

Depression in Teens | eSakal

शारीरिक इजा

कित्येक मुलांमध्ये स्वतःला इजा करून घेण्याचा प्रकार दिसतो. अशा वेळी तातडीने तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.

Depression in Teens | eSakal

बेभान

बऱ्याचदा तरुण वाहन चालवताना ओव्हरस्पीडिंग करणं, रात्री उशीरा घरी येणं, साध्या गोष्टी न ऐकणं अशा गोष्टी करताना दिसतात.

Depression in Teens | eSakal

हिंसात्मक वर्तणूक

नैराश्याच्या अवस्थेत स्वतःला त्रास देण्यासोबतच हिंसक वृत्तीही दिसून येते. यामुळे इतरांनाही त्रास होऊ शकतो.

Depression in Teens | eSakal

मदत

पालकांनी अशी लक्षणं दिसतात पाल्यांना विश्वासात घेऊन बोलणं गरजेचं आहे. सोबतच गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत देखील घ्यावी.

Depression in Teens | eSakal

नैराश्यातून उभारीसाठी अशी करा सुरूवात..

Depression Tips | eSakal