Aarti Badade
अजित पवार म्हणजेच कार्यकर्त्यांचे लाडके 'दादा'. प्रशासनावरील पकड आणि कामाचा धडाका ही त्यांची ओळख. १९९१ पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आजही तितकाच प्रभावी आहे.
Deputy CM Ajit Pawar (Dada) political journey
Sakal
१९९१ मध्ये अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा संसदेत पाऊल ठेवले. त्यानंतर १९९५ पासून सलग ८ वेळा त्यांनी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे.
Deputy CM Ajit Pawar (Dada) political journey
Sakal
जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२ या काळात त्यांनी कृषी, ऊर्जा आणि नियोजन यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचे 'राज्यमंत्री' म्हणून काम पाहिले. प्रशासकीय शिस्तीचा पाया याच काळात रचला गेला.
Deputy CM Ajit Pawar (Dada) political journey
Sakal
पाणीपुरवठा, ऊर्जा आणि पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. विशेषतः 'कृष्णा खोरे विकास महामंडळा'च्या माध्यमातून त्यांनी सिंचन क्षेत्रात अनेक निर्णय घेतले.
Deputy CM Ajit Pawar (Dada) political journey
Sakal
महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा म्हणजेच ६ वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांच्या नावावर आहे. संकटकाळ असो वा सत्तांतर, 'दादा' नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहेत.
Deputy CM Ajit Pawar (Dada) political journey
Sakal
४ जुलै २०२२ ते ३० जून २०२३ या काळात त्यांनी 'विरोधी पक्षनेते' म्हणून विधानसभेत सरकारला धारेवर धरले.
Deputy CM Ajit Pawar (Dada) political journey
Sakal
त्यानंतर २ जुलै २०२३ ला त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सत्तेत पुनरागमन केले.
Deputy CM Ajit Pawar (Dada) political journey
Sakal
महायुती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री आणि 'अर्थमंत्री' म्हणून त्यांनी राज्याच्या तिजोरीचे योग्य नियोजन केले.
Deputy CM Ajit Pawar (Dada) political journey
Sakal
अर्थसंकल्पातून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
Deputy CM Ajit Pawar (Dada) political journey
Sakal
आज २०२६ मध्येही अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अपरिहार्य व्यक्तिमत्व आहेत. सत्तेचे समीकरण जुळवण्यात आणि प्रशासकीय कामात त्यांचा हात धरणारा कोणीही नाही.
Deputy CM Ajit Pawar (Dada) political journey
Sakal
ajit pawar plane crash death
esakal