Mayur Ratnaparkhe
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे आज(२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झाले आहे.
१२ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे ३० एप्रिल २०११ रोजी विमान अपघातात निधन झाले.
२ सप्टेंबर २००९ रोजी एका हेलिकॉप्टर अपघातात वायएस राजशेखर रेड्डी (वायएसआर) यांचे निधन झाले.
काँग्रेस नेते, हरियाणाचे तत्कालीन ऊर्जामंत्री आणि उद्योगपती ओ.पी. जिंदाल यांचे ३१ मार्च २००५ रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.
जीएमसी बालयोगी (गंटी मोहन चंद्र बालयोगी) यांचे ३ मार्च २००२ रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. ते लोकसभेचे अध्यक्ष होते.
माधवराव सिंधिया यांचे ३० सप्टेंबर २००१ रोजी विमान अपघातात निधन झाले. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि ग्वाल्हेर राजघराण्याचे वारस होते.
२३ जून १९८० रोजी एका विमान अपघातात संजय गांधी यांचे निधन झाले. ते इंदिरा गांधी यांचे धाकटे पुत्र, काँग्रेस नेते आणि युवा काँग्रेसचे प्रमुख होते.
माजी केंद्रीय मंत्री मोहन कुमारमंगलम यांचे ३१ मे १९७३ रोजी विमान अपघातात निधन झाले. ते इंदिरा गांधी सरकारमध्ये स्टील आणि खाण मंत्री होते.
what is the airplane black box ajit pawar plane crash death
esakal