राहुल शेळके
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
विशेष म्हणजे अजित पवारांचा हा 11वा अर्थसंकल्प असणार आहे. माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अजित पवारांना मिळणार आहे.
शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानंतर जयंत पाटील (10 वेळा) आणि सुशीलकुमार शिंदे (9 वेळा) यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार अजित पवारांची एकूण संपत्ती 124 कोटी रुपयांची आहे. त्यांच्यावर 21.39 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
अजित पवारांच्या बँक खात्यांमध्ये 6.81 कोटींची रक्कम आहे. एनएसएस आणि पोस्ट ऑफिस योजनेत 1.52 कोटींची गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे कोणतीही लाइफ इंश्युरन्स पॉलिसी नाही.
अजित पवारांची शेअर्स आणि बॉण्ड्समध्ये गुंतवणूक आहे. यात 38 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 1.19 कोटींचे दागिने आहेत.
अजित पवारांकडे 3 ट्रेलर, टोयोटा कॅमरी, होंडा सीआरव्ही आणि ट्रॅक्टर यांसारखी वाहने आहेत. वाहनांची एकूण किंमत 75 लाख रुपये आहे तर सुनेत्रा पवार यांच्याकडे 10 लाखांची वाहने आहेत.
अजित पवारांकडे 13.21 कोटी रुपयांची शेतजमीन आहे. 37 कोटी रुपयांच्या अकृषिक जमिनीची नोंद त्यांच्या नावावर आहे.
अजित पवार 12 वी उत्तीर्ण आहेत. त्यांची गणना महाराष्ट्रातील श्रीमंत नेत्यांमध्ये होते. गेली अनेक वर्ष ते राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत.