kimaya narayan
बॉलिवूडमधील चार्मिंग अभिनेते म्हणजे देव आनंद. त्यांचं हँडसम व्यक्तिमत्त्व अनेकांना पसंत पडतं.
देव आनंद यांच्या भूमिकांबरोबरच त्यांचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहिलं.
देव आनंद यांचं पहिलं प्रेम धार्मिक विरोधामुळे अधुरं राहिलं. शेवटपर्यंत त्यांना या गोष्टीचं दुःख होतं.
मधुबाला सुपरहिट होण्यापूर्वी जिच्या सौंदर्याचे सगळेजण फॅन होते ती अभिनेत्री म्हणजे सुरैय्या. देव आनंद सुरैय्या यांच्या पहिल्याच क्षणात प्रेमात पडले.
‘किनारे किनारे चले जाएंगे’ गाण्याचं शूटिंग सुरु असताना सुरैय्या आणि देव आनंद यांचं बोटीत शूटिंग सूर होत तेव्हा त्या पाण्यात पडल्या. तेव्हा देव आनंद यांनी त्यांचा जीव वाचवला.
देव आनंद आणि सुरैय्या यांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. दोघांच्या घरातून संमती होती पण सुरैय्या यांच्या आजीचा या लग्नाला विरोध होता. कारण सुरैय्या मुस्लिम असल्यामुळे त्यांना आंतरधर्मीय विवाह त्यांना मंजूर नव्हता.
आजीच्या विरोधामुळे सुरैय्या यांनी नकार दिला. त्यांच्या घराच्या टेरेसवर सुरैय्या आणि देव आनंद यांची अखेरची भेट झाली. या भेटीनंतर देव आनंद चेतन यांच्या खांद्यावर ढसाढसा रडले.