kimaya narayan
नव्वदीच्या दशकातील यशस्वी अभिनेत्री म्हणजे मोनिका बेदी. हिंदी सिनेमांबरोबर साऊथ इंडियन सिनेइंडस्ट्रीत तिने स्वतःची ओळख कमावली होती.
मोनिकाचा जन्म पंजाबमधील होशियारपूरमध्ये झाला. खूप कमी वयात ती पंजाब सोडून बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आली. 'में तेरा आशिक' हा तिचा पहिला सिनेमा होता.
बॉलिवूडमध्ये तिने अनेक हिट सिनेमे दिले. यशाच्या शिखरावर असताना ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमशी संपर्कात आले आणि त्यांचं अफेअर सुरु झालं.
अबू सालेमशी प्रेमात पडल्यानंतर मोनिका अडचणीत सापडली. 2002 मध्ये तिला पोर्तुगालमध्ये अबू सालेमसोबत अटक करण्यात आली.
बनावट पासपोर्टमुळे मोनिकाला अटक करण्यात आली. तिची रवानगी तुरुंगात झाली. एका खुनाच्या प्रकरणात पोलीस अबूला शोधत होते तेव्हाच तिला अटक करण्यात आली.
मोनिकाने नंतर दिलेल्या मुलाखतीत अबूने तिला तो उद्योजक असल्याचं सांगितल्याचं उघड केलं. त्यांनी लग्नही केल्याचं तिने उघड केलं. 2005 मध्ये मोनिकाला भारतात आणण्यात आलं आणि 2007 मध्ये तिला जामीन मिळाला.
मोनिका सध्या सामान्य आयुष्य जगतेय. सरस्वतीचंद्र मालिकेत तिने काम केलं होतं. त्यानंतर तिने काही छोट्या-मोठ्या प्रोजेक्टस् मध्ये काम केलं.