Pranali Kodre
कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग समुद्रकिनारा.
Devbag Beach, Sindhudurg, Konkan
Sakal
देवबागमधील अरबी समुद्र आणि कर्ली नदी यांचा संगम हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे.
Devbag Beach, Sindhudurg, Konkan
Sakal
तारकर्लीपासून ५ किमी अंतरावर वाळूच्या बेटावर हे गाव वसलेलं आहे, नदीमार्गे नौकायानाचा आनंद घेत देवबागला जाता येतं.
Devbag Beach, Sindhudurg, Konkan
Sakal
या किनाऱ्यावर मच्छिमारांची वस्ती आहे. तसेच माड-पोफळीची झाडं आहेत. तसेच कर्ली नदीत बॅकवॉटरची सफरही करता येते.
Devbag Beach, Sindhudurg, Konkan
Sakal
दशावतार कलावंताची खाण म्हणूनही देवबागची ओळख आहे.
Devbag, Konkan
Sakal
येथे पर्यटकांना कर्ली नदी सफर आणि समुद्रात डॉल्फिन दर्शनही घडवले जाते. पर्यटकांना येथे वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेता येतो.
Devbag Beach, Sindhudurg, Konkan
Sakal
कोकणात फिरायला जात असाल, तर दोन-तीन दिवसात मालवण, तारकर्ली आणि देवबाग ही तिन्ही ठिकाणे फिरता येऊ शकतात.
Devbag Beach, Sindhudurg, Konkan
Sakal
उन्हाळा आणि हिवाळा हा पर्यटनासाठी उत्तम काळ आहे. येथे पाऊस भरपूर पडत असल्याने पावसाळ्यात देवबाग पर्यटनास बंद असते.
Devbag Beach, Sindhudurg, Konkan
Sakal
देवबागला जाण्यासाठी जवळचे बसस्थानक मालवण, तर जवळचे रेल्वेस्थानक कुडाळ आहे. तसेच पर्यटक खाजगी वाहने घेऊनही येथे येऊ शकतात.
Kudal, Konkan
Sakal
Guhagar, Ratnagiri, Konkan
Sakal