Pranali Kodre
कोकणातील अनेक स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणजे गुहागरचा समुद्रकिनारा.
Guhagar, Ratnagiri, Konkan
Sakal
रत्नागिरी जिल्हात गुहागर समुद्रकिनारा असून स्वच्छ आणि सुंदर आणि लाईफ गार्डमुळे सुरक्षित असा मानला जातो.
Guhagar, Ratnagiri, Konkan
Sakal
नारळी, पोफळींच्या बागा आणि सुरूच्या बनामुळे एका बाजूला हिरवाई, दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र आणि त्यांच्यामध्ये पांढर्या वाळूचा मोठा पट्टा हे सुंदर दृष्य येथे पाहाता येते.
Guhagar, Ratnagiri, Konkan
Sakal
गुहागर शहरातील बाग, भंडारवाडा, वरचा पाट, बाजारपेठ, खालचा पाट या परिसरातून समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी पाखाड्या बांधण्यात आल्या आहेत.
Guhagar, Ratnagiri, Konkan
Sakal
समुद्रकिनाऱ्यावर अनेक वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. तसेच स्पीट बोट, बनाना राईड, सँड स्कूटर, पॅरा सेलिंग याचाही आनंद घेता येतो.
Guhagar, Ratnagiri, Konkan
Sakal
नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान डॉल्फिनचेही दर्शन येथे होतं. येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचे संरक्षण आणि संवर्धन होतं, त्यामुळे जानेवारी ते मार्च दरम्यान कासवाची पिल्ले समुद्रात सोडताना पाहाता येतं.
Guhagar, Ratnagiri, Konkan
Sakal
गुहागरमध्ये मत्स्याहार, मांसाहार आणि शाकाहारी पद्धतीचेही जेवण उपलब्ध आहे.
Guhagar, Ratnagiri, Konkan
Sakal
गुहागरला जाण्यासाठी जवळचे रेल्वेस्थानक रत्नागिरी आहे, तर जवळचे बसस्थानक गुहागर आहे.
Guhagar, Ratnagiri, Konkan
Sakal
Dapoli, Ratnagiri, Konkan
Sakal