देवेंद्र फडणवीस यांनी कधी लढवली होती पहिली निवडणूक ?

Pranali Kodre

राजकीय कारकीर्दीची सुरुवात

नागपूरमधील प्रतिष्ठित कुटुंबात जन्मलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (ABVP) पासून राजकीय कारकीर्द सुरू केली.

Devendra Fadnavis First Election | Sakal

१९८७ - सामाजिक कार्याला सुरूवात

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सुरू केले. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

Devendra Fadnavis First Election | Sakal

१९८९ - भारतीय जनता युवा मोर्चाच्या वॉर्ड अध्यक्षपदी निवड

देवेंद्र फडणवीस यांची १९८९ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या धरमपेठ वॉर्ड अध्यक्षपदी निवड झाली. हा त्यांचा राजकारणातील प्रारंभिक टप्पा होता.

Devendra Fadnavis First Election | Sakal

१९९२ - नागपूर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष

१९९२ मध्ये नागपूर शहराच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली.

Devendra Fadnavis First Election | Sakal

१९९२ - २१व्या वर्षी नगरसेवक म्हणून निवड

देवेंद्र फडणवीस यांनी १९९२ मध्ये वयाच्या २१व्या वर्षी पहिल्यांदा नागपूर महानगरपालिकेतून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली होती.

Devendra Fadnavis First Election | Sakal

राम नगर वॉर्ड

नागपूर महापालिकेच्या राम नगर वॉर्डमधून त्यांनी ही निवडणूक लढली होती. त्यात ते विजयी झाले होते.

Devendra Fadnavis First Election | Sakal

सर्वांत तरुण नगरसेवक

विजयानंतर फडणवीस हे सर्वांत तरुण नगरसेवक ठरले होते.

Devendra Fadnavis First Election | Sakal

फडणवीसांचे वडील चालवायचे रसवंतीगृह, कसा झाला होता राजकारणात प्रवेश?

Devendra Fadnavis' Father Gangadharrao Fadnavis | Sakal
येथे क्लिक करा