Pranali Kodre
गंगाधरराव काशीराव फडणवीस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील.
त्यांचा जन्म १४ डिसेंबर १९३५, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे झाला. त्यांनी तर्कशास्त्रात एम.ए. शिक्षण घेतले.
गंगाधरराव RSS चे निष्ठावान स्वयंसेवक होते. संघातूनच त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
भाजपचे नागपूरमध्ये जनरल सेक्रेटरी होते. नागपूरच्या राजकारणात त्यांचा मोठा ठसा होता.
त्यांचा टाईल्सचा कारखाना होता शिवाय शेती आणि रसवंतीगृह असे व्यवसाय होते.
धरमपेठमधील लक्ष्मी चौकातले हे रसवंतीगृह राजकीय चर्चांचं गुऱ्हाळ होते. नागपूर भाजपच्या रणनीती तिथेच ठरत असत.
गंगाधरराव अनेक वर्षे विधान परिषदेचे आमदार होते. भाजपच्या स्थैर्याचा त्यांनी पाया घातला.
गंगाधररावांच्या निधनावेळी देवेंद्र १७ वर्षांचे होते. पित्याचा वारसा देवेंद्र आज पुढे नेत आहेत.
त्यांच्या निधनानंतरची जागा नितीन गडकरींना मिळाली. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासालाही गती मिळाली.