Aarti Badade
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर दिमाखात उभा असलेला देवगड किल्ला मराठा आरमाराच्या इतिहासाची आठवण करून देतो.
Devgad Fort history
Sakal
देवगड किल्ल्याच्या बांधकामाबाबत वेगवेगळ्या ऐतिहासिक नोंदी आढळतात. उपलब्ध माहितीनुसार या किल्ल्याला साधारण ३०० ते ३२० वर्षांचा इतिहास आहे.
Devgad Fort history
Sakal
काही ऐतिहासिक नोंदीनुसार मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या काळात म्हणजेच इ.स. १७०५ ते १७१० दरम्यान किल्ल्याच्या बांधकामाचा संदर्भ आढळतो.
Devgad Fort history
Sakal
काही कागदपत्रांमध्ये देवगड किल्ल्याचे बांधकाम मराठा सरदार दत्ताजीराव आंग्रे यांनी १७२९ मध्ये पूर्ण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे किल्ल्याच्या इतिहासाबाबत विविध मते आहेत.
Devgad Fort history
Sakal
तीन बाजूंनी समुद्राने वेढलेल्या या किल्ल्याच्या मुख्य भूभागाच्या बाजूला खोल खंदक आणि दगडी तटबंदी उभारण्यात आली आहे.
Devgad Fort history
Sakal
किल्ल्याच्या परिसरात ऐतिहासिक बुरुज आणि जुन्या तोफा पाहायला मिळतात. तसेच ब्रिटिश काळात १९१५ मध्ये बांधलेले दीपगृह आणि हनुमान मंदिरही येथील आकर्षण आहे.
Devgad Fort history
Sakal
देवगड खाडी आणि अरबी समुद्राच्या परिसरातील हे ठिकाण निसर्ग आणि इतिहासाचा अनोखा संगम आहे. किल्ल्यावरून दिसणारा समुद्र आणि सूर्यास्त पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतो.
Devgad Fort history
Sakal
World End Baba Vanga predictions
Sakal