Pranali Kodre
कोकणातील रत्नागिरीतील दडलेले एक रत्न म्हणजे कशेळीचा देवघळी समुद्रकिनारा. निसर्गाच्या सानिध्यात निवांतपणा हवा असेल, तर हे पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे.
Devghali Beach, Kasheli, Ratnagiri
X/maha_tourism
फारशी गर्दी नसलेलं हे ठिकाण असून निरव शांत वातावरणाचा आनंद घेत ताजेतवाने होण्याचा अनुभव हा समुद्र किनारा देतो.
Devghali Beach, Kasheli, Ratnagiri
X/maha_tourism
कशेळीचा हा वळणादार किनारा असून किनाऱ्या लगतचे रांगडे खडक निसर्गाचे एक वेगळेच रुप दाखवतात.
Devghali Beach, Kasheli, Ratnagiri
X/maha_tourism
सोनेरी वाळूचा किनारा म्हणूनही हा समुद्रकिनारा ओखळला जातो. हा परिसर पाम वृक्षांनी डवरलेला असून डोंगराआडून मावळतीला जाणारा सूर्य आणि आकाशाच्या रंगछटा मन प्रसन्न करतात.
Devghali Beach, Kasheli, Ratnagiri
X/maha_tourism
या देवघळी किनऱ्यावर स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य असते. त्यामुळे पक्षी निरीक्षकांसाठीही हे एक उत्तम ठिकाण आहे.
Devghali Beach, Kasheli, Ratnagiri
X/maha_tourism
देवघळी किनारा तिथल्या 'टेबल पॉईंट' मुळे देखील प्रसिद्ध आहे. उंचीवरुन नजर टाकल्यास अथांग निळाशार समुद्र, सोनेरी वाळू आणि उसळलेल्या लाटांचे अफलातून दृष्य पाहायला मिळते.
Devghali Beach, Kasheli, Ratnagiri
X/maha_tourism
देवघळी किनाऱ्याजवळच असलेल्या रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनारा, गणेशगुळे समुद्रकिनारा, जिजामाता उद्यान, ठीबा पॅलस आणि रत्नदुर्ग किल्ला ही ठिकाणांनाही भेट देता येते.
Devghali Beach, Kasheli, Ratnagiri
X/maha_tourism
कशेळी गावातून समुद्रकिनाऱ्यापर्यंत रस्ता आहे. खाजगी गाडी घेऊनही किनाऱ्यापर्यंत जाता येते. दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर जाताना सुचनांचे पालन करणेही महत्त्वाचे आहे.
Devghali Beach, Kasheli, Ratnagiri
X/maha_tourism
Anjarle, Dapoli Tourism
Sakal