Apurva Kulkarni
मालिका विश्वातील अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने पारस छाबडा पॉडकास्टला मुलाखत दिली.
या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, 'तुझा मुलगा राम बनणार की अब्दुल' यावर देओलीना उत्तर देत भारतीय बनणार असं म्हटलय.
ती म्हणाली की, 'तो पुर्णपणे इंडियन, भारतीय बनणार आहे.'
ती पुढे म्हणाली की, 'जगण्यासाठी जर धर्म गरजेचा आह तर तो भारतीय असेल, दोन्ही धर्माद्वारे माझा मुलगा काही चांगलं शिकत असेल तर ती चांगली गोष्ट आहे.'
'भविष्यात तो एक चांगला माणूस बनेल आणि हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.'
'मी घरी पुजा करते तर नवरा नमाज पडतो. मुलगा या दोन्हीही गोष्टी पाहतो.'
देवोलीनाने 14 डिसेंबर 2022मध्ये जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत लग्न केलय.