विमान प्रवासात दारू नेता येते का? DGCA चे नियम जाणून घ्या

Yashwant Kshirsagar

नियम

देशांर्गत विमान प्रवासात किती दारु नेता येते याबाबत सोशल मीडियावर अनेक चुकीच्या माहिती फिरतात, पण DGCA आणि एअरलाइन्सच्या नियम काय आहेत ते जाणून घेऊया

Carry Alcohol on Flight DGCA Rules

|

esakal

हँड बॅगेज मध्ये मर्यादा

हँड बॅगेजमध्ये १०० मिली पेक्षा जास्त दारुची बाटली घेऊन जाणे सामान्यतः बंदी आहे. फक्त एअरपोर्टच्या सिक्युरिटी होल्ड एरियातून खरेदी केलेली (ड्युटी-फ्री) अल्कोहोल काही एअरलाइन्समध्ये १ लिटरपर्यंत परवानगी असते, पण ती STEB बॅगेत असावी लागते.

Carry Alcohol on Flight DGCA Rules

|

esakal

चेक-इन बॅगेजमध्ये मर्यादा

चेक-इन (रजिस्टर्ड) बॅगेजमध्ये तुम्ही ५ लिटरपर्यंत अल्कोहोल नेऊ शकता. याचा अर्थ साधारण १ लिटरच्या ५ बाटल्या (व्हिस्की, रम, वोडका इ.).

Carry Alcohol on Flight DGCA Rules

|

esakal

अल्कोहोलचे प्रमाण

दारुमध्ये अल्कोहोलचे प्रमाण २४% ते ७०% ABV (Alcohol By Volume) दरम्यान असावे. ७०% पेक्षा जास्त अल्कोहोल असलेली दारु नेण्यास पूर्णपणे बंदी आहे.

Carry Alcohol on Flight DGCA Rules

|

esakal

२४% पेक्षा कमी अल्कोहोल

बीयर, वाइन किंवा २४% पेक्षा कमी अल्कोहोल असलेल्या पेयांसाठी कोणतीही विशिष्ट मात्रेची मर्यादा नाही. फक्त बॅगेच्या वजनाची मर्यादा लागू होते.

Carry Alcohol on Flight DGCA Rules

|

esakal

पॅकिंग

बाटल्या मूळ रिटेल पॅकेजिंग मध्ये असाव्यात. लीक होऊ नये म्हणून बबल रॅप किंवा मऊ कपड्यात चांगल्या गुंडाळा. ब्रेकेज टाळण्यासाठी कपड्यांमध्ये ठेवा.

Carry Alcohol on Flight DGCA Rules

|

esakal

वापरलेल्या बाटल्या

अर्धवट वापरलेल्या किंवा उघडलेल्या बाटल्या घेऊन जाणे कडक बंदी आहे. फक्त सीलबंद आणि नवीन बाटल्या नेण्यास परवानगी आहे.

Carry Alcohol on Flight DGCA Rules

|

esakal

वजन आणि एक्स्ट्रा चार्जेस

५ लिटर अल्कोहोल नेमके ५-६ किलो वजन वाढवते. एअरलाइनच्या चेक-इन बॅगेज वेट लिमिट ओलांडल्यास एक्स्ट्रा शुल्क भरावे लागते.

Carry Alcohol on Flight DGCA Rules

|

esakal

फ्लाइटमध्ये दारु पिणे

स्वतः आणलेली दारु विमानात पिणे पूर्णपणे बंदी आहे. फक्त एअरलाइनने दिलेले पेय पिण्यास परवानगी आहे.

Carry Alcohol on Flight DGCA Rules

|

esakal

राज्य सरकारचे नियम

राज्य सरकारांच्या नियमांचाही विचार करा (उदा. गुजरातमध्ये बंदी). नेहमी DGCA चे नियम फॉलो करा, दारुची सुरक्षित पॅकिंग करा आणि मजेत प्रवास करा

Carry Alcohol on Flight DGCA Rules

|

esakal

पर्यटनासाठी सुरक्षित जगातील टॉप १० देश, एकदा तरी करावी सफर

Safest Countries For Travel

|

esakal

येथे क्लिक करा