सकाळ वृत्तसेवा
संतोष देशमुख हत्येप्रकरणी वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला.
सोमवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.
धनंजय मुंडे यांनी निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दाखल केले होते. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्याकडे जवळपास 53.80 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे दिसून आले होते. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली.
15 कोटींची वाहने, दीड किलो चांदी, 23 लाखांचे दागिने. धनंजय मुंडे यांच्याकडे 2019 मध्ये 23 कोटींची संपत्ती होती.
तर 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात 53.80 कोटींची संपत्ती नमूद करण्यात आली आहे. पाच वर्षांमध्ये मुंडेंच्या संपत्ती सुमारे 31 कोटी रुपयांनी वाढली आहे.
धनंजय मुंडे त्यांची पत्नी आणि कुटुंबाकडे 53 कोटी 80 लाखांची संपत्ती आहे. मागील पाच वर्षात यामध्ये दुपटीने म्हणजे 30.75 कोटी रुपयांची वाढ झालीय.
2019 मध्ये त्यांच्याकडे 23 कोटींची संपत्ती होती. धनंजय मुंडे यांच्याकडे 15 कोटींची वाहने, दीड किलो चांदी आहे.
तर त्यांच्या नावे 15 कोटी 55 लाख 5 हजार 105 रुपयांचे विविध वाहने आहेत. त्यात अगदी टँकर पासून ते बुलेट पर्यंतच्या सात वाहनांचा यात समावेश आहे.