संतोष कानडे
राज्याचे माजी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात गेले आहेत
मनःशांती आणि मानसिक आरोग्यासाठी लोक विपश्यना केंद्रात जातात. इगतपुरीचे हे केंद्र जगभरात प्रसिद्ध आहे
मागच्या सहा महिन्यांपासून धनंजय मुंडेंना राजकीय आणि सामाजिक संघर्षाला सामोरं जावं लागलं होतं
बीडच्या संतोष देशमुखांच्या खून प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळची माणसं आरोपी आहेत
धनंजय मुंडेंचा राईट हँड म्हणून ओळख असलेला वाल्मिक कराड या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे
त्यानंतर धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी त्यांनी प्रकृतीचं कारण दिलं होतं
सुरुवातीला पालकमंत्रीपद हातचं गेलं, पुन्हा मिळालेलं मंत्रिपदही गेलं. शिवाय त्यांना तब्येतीच्या तक्रारी होत्याच
या सगळ्यांमुळे धनंजय मुंडे डिस्टर्ब झालेले आहेत. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी त्यांनी विपश्यना केंद्र जवळ केलं
धनंजय मुंडेंच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत. देशमुख खून प्रकरणात पुरवणी दोषारोपपत्र सादर होणं बाकी आहे
एवढंच नाही तर त्यांच्या आमदारकीविरोधातही कोर्टात प्रकरण सुरु आहे. त्याचाही निकाल येणार आहे
विशेष म्हणजे घरगुती हिंसाचार प्रकरणात मुंडेंना कोर्टाने दोषी ठरवलेलं आहे. करुणा मुंडेंना त्यांना पोटगी द्यावी लागणार आहे