संतोष कानडे
माजी मंत्री आणि बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
त्याचा हा नवा लूक आहे. पांढऱ्या दाढीतले धनंजय मुंडे यापूर्वी कुणी बघितले नसतील. परंतु त्या हा लूक व्हायरल झाला आहे.
उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीडच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबतच्या बैठकीतला हा फोटो आहे.
परळीतल्या श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंबंधाची ही बैठक होती. हा आराखडा आता ३५१ कोटींचा होणार आहे.
खुद्द धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. कपाळावर चंदन आणि वाढलेली दाढी.
धनंजय मुंडे यांना पूजापाठ करण्यात रस असतो. प्रभू वैद्यनाथावर त्यांची विशेष भक्ती आहे.
बीड जिल्ह्यातल्या काही अप्रिय घटनांमुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपद गमवावं लागलं.
राज्य सरकारचे तीन अधिवेशन झाले, परंतु धनंजय मुंडे मतदारसंघातला कुठलाही मुद्दा मांडताना दिसले नाहीत.
पालकमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकांनाही ते फारसे दिसत नाहीत की जिल्ह्यात त्यांच्यासोबत फिरत नाहीत.