एका हत्तीची किंमत किती असते?

संतोष कानडे

कोल्हापूर

कोल्हापूरच्या नांदणी मठातल्या महादेवी हत्तीणीमुळे सध्या राज्यभर हत्तीच्या भोवती चर्चा सुरु आहेत.

हत्ती

परंतु खरंच हत्ती विकला जातो का? किंवा एका हत्तीची किंमत किती असते? हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

महाग

हत्तीची किंमत ही वय, लिंग, आरोग्य आणि त्याच्या क्षमता यावरुन ठरत असते. लहान हत्तींपेक्षा प्रौढ हत्ती हे जास्त महाग असतात.

नर हत्ती

विशेष म्हणजे नर हत्ती हे मादी हत्तींपेक्षा जास्त किंमतीचे असू शकतात. त्याचं कारण हत्तींचे मोठ्या आकाराचे दात.

धार्मिक

निरोगी आणि प्रशिक्षित हत्तींना जास्त मागणी असते. त्यामुळे धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वापरले जाणारे हत्ती महाग असतात.

१० लाख

द इकॉनॉमिक्स टाईम्सच्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी एका हत्तीची किंमत १० लाख रुपये होती.

१० कोटी रुपये

परंतु सद्य घडीला एका हत्तीची किंमत १० कोटी रुपये झाली आहे. ही किंमत अनधिकृत माहितीवर अवलंबून आहे.

तस्करी

हत्तीचे दात मौल्यवान असतात. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये दातांना मोठी मागणी असते. हस्तीदंतांची तस्करीदेखील होते.

पश्चिम बंगाल

काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये हस्तीदंताच्या तस्करीमध्ये १ कोटी ७० लाख रुपयांचे दात जप्त करण्यात आलेले होते.

मुघलांच्या हरममध्ये नेमकं काय व्हायचं?

mughal harem | esakal
<strong>येथे क्लिक करा</strong>