Success Story : अपेक्षित तेच हेरलं, गारवा पदार्थ निर्मीतीत नाव कमवणाऱ्या धनश्री ताईंनी जपलं वेगळेपण

Sandeep Shirguppe

गारवा पदार्थ

जयसिंगपूर (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील सौ.धनश्री वर्धमान खुरपे यांनी गारवा पदार्थ निर्मितीमध्ये निपुणता मिळवत वेगळेपण जपले आहे.

Success Story | esakal

गारव्यासोबत दिवाळी पदार्थ

गारव्याच्या पदार्थांबरोबर, दिवाळी पदार्थ बनवून कायमस्वरूपी ग्राहक आणि आर्थिक स्‍थिरता मिळवली.

Success Story | esakal

व्यावसायिकतेच्या दिशेने...

ग्रामीण भागात गारवा देण्याला खूप महत्त्व आहे. हीच गरज ओळखून धनश्रीताईंनी गारवा पदार्थ निर्मितीला व्यावसायिक स्वरूप दिले.

Success Story | esakal

गारव्यासाठी मोठी मागणी

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक गावांमधून गारव्यासाठीच्या पदार्थांना मोठी मागणी असते. यामध्ये धनश्रताईंनी चांगलाच हातखंडा मिळवला.

Success Story | esakal

व्यवसाय वृद्धीसाठी अनेकांची मदत

सणसमारंभासाठी लागणारे पदार्थ आणि गारव्यासाठी मित्र मंडळींना त्यांचे नाव सुचवतात, त्यातूनही त्यांना व्यवसाय वृद्घीसाठी चांगली मदत झाली आहे.

Success Story | esakal

करिअर फूड टेक्नॉलॉजीमध्ये

मोठी मुलगी पायल हिने फूड टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक केले आहे. आर्या ही कृषी शिक्षण घेत आहे. दोन्ही मुली गरजेनुसार धनश्रीताईंना पदार्थ निर्मितीत मदत करतात.

Success Story | esakal

सोशल मीडियाचा वापर

धनश्रीताईंच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांचे व्हॉटसअप ग्रुप आहेत. यामध्ये त्या दररोज तयार होणाऱ्या पदार्थांची माहिती देतात.

Success Story | esakal

नाष्टा, दिवाळी पदार्थांनाही मागणी

गारव्याचा हंगाम वर्षभर सुरू असतो. या कालावधीत आठवड्यातून एक ते दोन गारव्यासाठी मागणी असते. याशिवाय दिवाळीसाठी लागणारे विविध फराळाचे पदार्थ करतात.

Success Story | esakal

असा असतो गारवा

गारव्यामध्ये विशेष करुन भाकरी, झुणका, तूरडाळीची उसळ, दहीभात, शेंगदाणे चटणी, गावरान वांग्याची भाजी, लोणचे आणि नाचणी आंबील यासारख्या पदार्थांचा समावेश असतो.

Success Story | esakal
आणखी पाहा...