Aarti Badade
भारतातील प्रत्येक घरात पूजली जाणारी तुळस ही एक औषधी वनस्पती असून, ती शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
तुळशीमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि व्हिटॅमिन C, कॅल्शियम, झिंक, लोह व क्लोरोफिल भरपूर प्रमाणात असतात.
तुळशीचा नियमित वापर केल्यास फुफ्फुसं मजबूत होतात, श्वास घेण्यास मदत होते आणि घशाचे विकार कमी होतात.
तुळशीचा चहा बनवा – ताजी किंवा वाळवलेली तुळशीची पाने पाण्यात उकळा आणि दिवसातून १-२ वेळा प्या. घसा व फुफ्फुसं स्वच्छ राहतात.
तुळशीचा रस बनवा – ताजी पाने बारीक करून त्यात मध आणि लिंबू मिसळा. यामुळे श्वासोच्छ्वास सुलभ होतो.
तुळस जेवणात वापरा – सूप, सॅलड किंवा स्मूदीमध्ये तुळशीची पाने टाका. चवही वाढेल आणि आरोग्य फायदेही मिळतील.
तुळस सामान्यतः सुरक्षित आहे, पण जर तुम्ही औषधं घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुळशीचा नियमित वापर केल्याने फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं आणि श्वासाचा त्रास कमी होतो.