Pranali Kodre
भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
तो त्याची पक्ती धनश्रीपासून ४ वर्षांच्या संसारानंतर नुकताच विभक्त झाल्याचे समोर आले आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार त्यांची घटस्फोटाची केस न्यायालयात आहे.
या चर्चा सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी धनश्रीने इंस्टाग्रामवरील तिच्या अकाऊंटवरील चहलसोबतचे फोटोही हटवले होते.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ फायनलमध्ये युझवेंद्र चहल दुबईच्या स्टेडियममध्ये आरजे माहवश हिच्यासोबत दिसला होता. त्यानंतर त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या.
यानंतर सोमवारी धनश्रीने इंस्टाग्रामवरील चहलसोबतचे सर्व फोटो रिस्टोअर (unarchived) केल्याचे दिसले. त्यामुळे आता अनेक उलट-सुलट चर्चा होत आहेत.
चहल आरजे महावशसोबत दिसल्याने धनश्रीने फोटो अनअर्चिव्ह केल्याचे, काही सोशल मीडिया युझर्सने म्हटले आहे.
काही युझर्सने असा कयास लावला आहे की कदाचित युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या समेट घडून आला असावा.
दरम्यान, आरजे महावश हिने चहलसोबतच्या रिलेशनबाबत चर्चा फक्त अफवा असल्याचे एक पोस्ट करत म्हटले आहे.