सकाळ डिजिटल टीम
युझवेंद्र चहल व पत्नी धनश्री वर्मा यांनी इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केले. त्याचबरोबर चहलने धनश्रीसोबतचे फोटोज देखील डिलीट केले.
सुत्रांच्या माहितीनुसार लवकरच ते अधिकृतरित्या घटस्फोट घेणार आहेत.
चहल-धनश्रीचा घटस्फोट झाल्यास त्याला धनश्रीला किती संपत्ती द्यावी लागेल ? यासाठी चहलची कमाई जाणून घेऊयात.
युझेवेंद्र चहल भारतीय क्रिकेटपटू असून तो विविध देशांमध्ये लीग सामनेही खेळतो.
आयपीएलच्या आगामी हंगामात तो पंजाब किंग्ज संघाकडून खेळणार आहे. त्याला पंजाब किंग्जने लिलावात १८ कोटी रूपयांत करारबद्ध केले आहे.
फिरकीपटू यझवेंद्र चहलची एकूण संपत्ती ४५ कोटी इतकी आहे.
धनश्री वर्मा प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. तिचे युट्यूबवरील डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात. त्याचबरोबर तीने टीव्ही शोजमध्ये देखील काम करते.
धनश्री वर्माची एकूण संपत्ती जवळपास २५ कोटी इतकी आहे.
धनश्री वर्मा व युझवेंद्र चहल दोघांचीही आर्थिक स्थिती भक्कम आहे. त्यामुळे घटस्फोटानंतर संपत्तीची विभागणी कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
त्याचबरोबर संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा निर्णय धनश्रीवर देखील अवलंबून आहे.