सकाळ डिजिटल टीम
मागच्या काही काळात अनेक भारतीय क्रिकेटपटूंचे घटस्फोट झाले आहेत.
ज्यामध्ये हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, मोहम्मद शमी, शिखर धवन या खेळांडूंचा समावेश आहे.
त्यानंतर आता फिरकीपटू युझवेंद्र चहलचा पत्नी धनश्री वर्मासोबत घटस्फोट होणार असल्याचे म्हटले जात आहे.
त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला महिन्याभरापुर्वीच सोशल मीडियावर सुरूवात झाली होती.
कारण सोशल मीडियावर सातत्याने अॅक्टिव्ह असणाऱ्या धनश्रीने मागचे अनेक दिवस चहलसोबतचा फोटो पोस्ट केला नव्हता.
त्याचबरोबर ती नेहमीच मित्र मैत्रिणींसोबतची इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत असते, पण चहलसाठी तीने स्टोरी शेअर केली नव्हती.
त्यानंतर त्यांच्यामध्ये बिनसले असल्याची बातमी समोर आली होती.
मात्र आता दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. युझवेंद्रने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील धनश्री सोबतचे सर्व फोटो डिलिट केले आहेत.
त्याचबरोबर सुत्रांच्या माहितीनुसार ते लवकरच अधिकृतपणे घटस्फोट घेणार आहेत.