Anushka Tapshalkar
धनत्रयोदशीला चाकू, सुरी, कात्री किंवा ब्लेड खरेदी करणं काही घरांमध्ये अशुभ मानलं जातं. या वस्तू नात्यांमध्ये दुरावा आणि वाद निर्माण होण्याचं प्रतीक मानल्या जातात.
Sharp Items
sakal
पारंपरिक मान्यतेनुसार लोखंडाचा संबंध शनिदेवांशी जोडला जातो. त्यामुळे धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी करणं काही कुटुंबांमध्ये टाळलं जातं. त्याऐवजी सोने, चांदी, तांबे आणि पितळ खरेदीला प्राधान्य दिलं जातं.
Iron Items
sakal
काळा रंग काही धार्मिक परंपरांमध्ये अशुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी काळे कपडे, चप्पल, बॅग किंवा इतर वस्तू खरेदी करणं टाळलं जातं. लाल, पिवळ्या आणि सोनेरी रंगांना पसंती दिली जाते.
Black Color Things
sakal
काच सहज फुटू शकते. त्यामुळे तिचा संबंध अस्थिरता आणि नुकसानाशी जोडला जातो. काही पारंपरिक मान्यतांनुसार धनत्रयोदशीला काचेच्या वस्तू खरेदी करणं टाळावं.
Glass or Intricate Things
sakal
काही प्रादेशिक मान्यतांनुसार धनत्रयोदशीला तेल, तूप आणि इतर खाद्यतेल खरेदी करणं टाळलं जातं. मात्र दिवाळीत पूजा आणि पणत्या लावण्यासाठी तेल व तुपाचा वापर करण्यास मनाई नाही.
Oil and Ghee
sakal
चामडं प्राण्यांच्या कातडीपासून तयार केलं जात असल्यामुळे काही कुटुंबांमध्ये धनत्रयोदशीला चामड्याचे बूट, बेल्ट, पाकीट किंवा बॅग खरेदी करणं टाळलं जातं.
Leather Items
sakal
धनत्रयोदशीला नवीन भांडी खरेदी करणं शुभ मानलं जातं. मात्र ही भांडी घरी आणताना रिकामी आणू नयेत, अशी पारंपरिक समजूत आहे. त्यात तांदूळ, गहू, पाणी, साखर किंवा धणे भरून घरात आणले जातात. हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं.
Empty Utensils
sakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Disclaimer
sakal
This Village Has Celebrated Diwali Without Firecrackers
eSakal