शिवरायांच्या पणजोबांचा किल्ला...येथेच शंभूराजांनी दिलं बलिदान

Shubham Banubakode

पांडे-पेडगांवचा भुईकोट

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात, भीमा नदीच्या उत्तर तीरावर 110 एकरांवर पसरलेला पांडे-पेडगांवचा भुईकोट किल्ला 13व्या शतकात बांधला.

Pandepedgaon Fort - Dharmaveergad | esakal

बाबाजी भोसलेंची जबाबदारी

छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे या किल्ल्याच्या देखभालीची जबाबदारी निजामशहाने सोपवली होती.

Pandepedgaon Fort - Dharmaveergad | esakal

मोगलांचा ताबा आणि बहादूरगड

निजामशाहीकडून मोगलांनी हा किल्ला जिंकला आणि औरंगजेबाचा दुधभाऊ बहादूरखान कोकलताश याच्याकडे त्याची जबाबदारी आली. याच काळात किल्ल्याचे नाव ‘बहादूरगड’ असे झाले.

Pandepedgaon Fort - Dharmaveergad | esakal

शिवरायांचा गनिमी कावा

1674 मध्ये रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर आर्थिक रसद मिळवण्यासाठी त्यांनी पेडगांवच्या किल्ल्यावर हल्ला केला.

Pandepedgaon Fort - Dharmaveergad | esakal

संभाजी महाराजांचे बलिदान

2008 मध्ये या किल्ल्याचे नाव ‘धर्मवीरगड’ असे ठेवण्यात आले, कारण येथेच छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिले. संगमेश्वर येथे अटक झाल्यानंतर त्यांना याच किल्ल्यावर आणले गेले.

Pandepedgaon Fort - Dharmaveergad | esakal

औरंगजेबाशी ऐतिहासिक भेट

संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर या किल्ल्याच्या राजदरबारात उभे केले गेले. येथे त्यांनी औरंगजेबाचा धर्मांतराचा प्रस्ताव नाकारला आणि हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिले.

Pandepedgaon Fort - Dharmaveergad | esakal

स्थापत्य आणि मुघल प्रभाव

किल्ल्याच्या तटबंदीजवळील राजदरबारात मुघल शैलीतील चुनेगच्ची आणि वीटांचे दुमजली बांधकाम आहे.

Pandepedgaon Fort - Dharmaveergad | esakal

प्राचीन मंदिरांचा समूह

किल्ल्यावर चालुक्यकालीन श्री लक्ष्मीनारायण, गजलक्ष्मी, बालेश्वर, मल्लिकार्जुन, रामेश्वर, पाताळेश्वर आणि भैरवनाथ मंदिरांचे अवशेष आहेत.

Pandepedgaon Fort - Dharmaveergad | esakal

पवित्र शौर्यस्तंभ

किल्ल्याच्या उत्तर दरवाजातून प्रवेश केल्यानंतर समोर शौर्यस्तंभ आहे, जिथे संभाजी महाराज आणि कवी कलश यांना औरंगजेबासमोर उभे केले गेले.

Pandepedgaon Fort - Dharmaveergad | esakal

पर्यटन आणि संवर्धनाची गरज

धर्मवीरगड आज दुर्गसंवर्धनामुळे पुन्हा इतिहासाशी जोडला गेला आहे. परंतु त्याच्या जतनासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे.

Pandepedgaon Fort - Dharmaveergad | esakal

लाल महालापूर्वी 'या' वाड्यात होतं शिवरायांचं वास्तव्य...आजही देतोय इतिहासाची साक्ष

Khed Shivapur Wada: Shivaji Maharaj's Residence Before Lal Mahal | esakal
हेही वाचा -