शिक्षणमंत्री असेलल्या धर्मेंद्र प्रधानांचं शिक्षण किती?

Anushka Tapshalkar

देशभरात 'CJP'चे आंदोलन

नीट पेपरफुटी आणि शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहारांविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे. संसद भवनाकडे काढलेल्या मोर्च्यानंतर हे आंदोलन पुन्हा चर्चेत आले आहे.

CJP Protest

|

eSakal

संसदेकडे धडक मोर्चा

सोमवारी आंदोलनकर्त्यांनी संसद भवनकडे मोर्चा काढला. पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केल्याने हा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय ठरला.

Protest Towards Parliament

|

eSakal

धर्मेंद्र प्रधान कोण आहेत?

धर्मेंद्र प्रधान हे जून 2024 पासून भारताचे केंद्रीय शिक्षणमंत्री आहेत. त्यांचा जन्म 26 जून 1969 रोजी ओडिशातील तालचर येथे झाला.

Who is Dharmendra Pradhan

|

eSakal

विद्यार्थी राजकारणातून सुरुवात

1983 मध्ये तालचर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले.

Initially in ABVP

|

eSakal

नेतृत्वाची जबाबदारी

1985 मध्ये ते तालचर कॉलेज विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1993 मध्ये एबीव्हीपीचे राज्य सचिव आणि 1995 मध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काम केले.

Leadership Opportunity

|

eSakal

शैक्षणिक पात्रता काय?

धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशातील वाणी विहार येथील उत्कल विद्यापीठातून मानवशास्त्र (Anthropology) विषयात पदव्युत्तर पदवी (एम.ए.) प्राप्त केली आहे.

Dharmendra Pradhan Educational Qualification

|

eSakal

आंदोलनाला वाढता पाठिंबा

आंदोलनातील पोलिस कारवाईचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी स्वतः चर्चेसाठी पुढे यावे, अशी मागणी केली आहे.

Ongoing Protest

|

eSakal

केंद्रीय मंत्री राजीनामा कुणाकडे देतात? काय असते प्रक्रिया?

Dharmendra Pradhan

|

Esakal

आणखी वाचा