Varsha Balhe
बीड जिल्ह्यातील धारूर गड हा महाराष्ट्रातील एकमेव मिश्रदुर्ग आहे. समोरून भुईकोट आणि तीन बाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेला हा गड इतिहासाचा अनोखा वारसा जपतो.
History Of Dharur Fort In Maharashtra
esakal
राष्ट्रकुट राजा धारसिंहाने या भक्कम दुर्गाची उभारणी केली. त्याने या गडाला ‘महादुर्ग’ असे नाव दिले होते.
History Of Dharur Fort In Maharashtra
esakal
सातवाहन काळात धारूर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. सीताफळे, खवा आणि सोन्याच्या बाजारपेठेमुळे या शहराला विशेष ओळख मिळाली होती.
History Of Dharur Fort In Maharashtra
esakal
राष्ट्रकुट, चालुक्य, यादव, बहामनी, निजाम, आदिलशाही, मोगल आणि मराठे अशा अनेक सत्तांनी धारूरवर राज्य केले.
History Of Dharur Fort In Maharashtra
esakal
छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मराठ्यांनी धारूर जिंकण्यासाठी मोठा संघर्ष केला. राणोजी घोरपडे यांनीही मोगलांवर येथे धडक कारवाया केल्या.
History Of Dharur Fort In Maharashtra
esakal
धारूर गडात अंबरखाना, हत्तीखाना, हमामखाना, भुयारी मार्ग, पाण्याची टाकी आणि विशाल महाद्वार पाहायला मिळते.
History Of Dharur Fort In Maharashtra
esakal
या दुर्गावर सुमारे ३५ भक्कम बुरुज आहेत. खोल दऱ्या आणि मजबूत तटबंदीमुळे हा गड सहज जिंकणे कठीण होते.
History Of Dharur Fort In Maharashtra
esakal
धारूर गड बीडपासून सुमारे ७० किमी अंतरावर आहे. बीड, लातूर, परळी, अंबाजोगाई आणि बार्शी येथून बस, रेल्वे किंवा कारने सहज जाता येते.
History Of Dharur Fort In Maharashtra
esakal
Bhandardara Fireflies Festival
esakal