वाईच्या ढोल्या गणपतीचा आकार कमी जास्त होतो का? पाहा रहस्य!

सकाळ डिजिटल टीम

सातारा

सातारा जिल्ह्यातील वाई येथे कृष्णा नदीच्या पाठीवर १७६२ मध्ये बांधलेले प्रसिद्ध अन् प्राचीन महागणपती मंदिर आजही तितक्याच दिमाखात उभे आहे.

Is Wai's Dholya Ganpati Idol Shrinking?

|

sakal 

'ढोल्या गणपती'

एकाच सलग काळ्या दगडातून घडवलेल्या अत्यंत भव्य अन् विशाल आकारामुळे या गणपतीला संपूर्ण महाराष्ट्रात 'ढोल्या गणपती' म्हणून ओळखले जाते.

Is Wai's Dholya Ganpati Idol Shrinking?

|

sakal 

पेशव्यांचे सरदार रास्ते

पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी १७६२ मध्ये तब्बल १ लाख ६० हजार रुपये खर्च करून हे प्रसिद्ध मंदिर उभारले होते.

Is Wai's Dholya Ganpati Idol Shrinking?

|

sakal 

पुराचे पाणी

कृष्णा नदीच्या पात्रातील महापुराचा पाण्याचा दाब दुभंगून मंदिराला कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी मंदिराच्या मागच्या भिंतीची रचना नावेच्या टोकासारखी (मत्स्याकार) केली आहे.

Is Wai's Dholya Ganpati Idol Shrinking?

|

sakal 

कर्नाटकातील बेसॉल्ट दगड

या मंदिरासाठी आणि मूर्तीसाठी कर्नाटकातून बेसॉल्ट दगड आणला गेला होता, जो सुरुवातीला मऊ अन् नंतर हवा-पाण्याच्या संपर्काने अधिक कठीण होत जातो.

Is Wai's Dholya Ganpati Idol Shrinking?

|

sakal 

एकाश्म दगड; ६ फूट उंच मूर्ती

मंदिराच्या गर्भगृहात एकाच दगडात कोरलेली, दोन्ही मांड्या रोवून बसलेली, ६ फूट उंच आणि ७ फूट रुंद अशी भव्य डाव्या सोंडेची मूर्ती विराजमान आहे.

Is Wai's Dholya Ganpati Idol Shrinking?

|

sakal 

विजेपासून संरक्षण

मंदिराच्या ७५ फूट उंच शिखरावर बसवलेली लोखंडी पहार ही प्राचीन काळातील नैसर्गिक वीजवाहक (लाइटनिंग अरेस्टर) म्हणून काम करते, ज्यामुळे मंदिराचे विजेपासून रक्षण होते.

Is Wai's Dholya Ganpati Idol Shrinking?

|

sakal 

युद्धाला जाणारे रूप

ही गणेशमूर्ती सामान्यतः आशीर्वाद देणारी नसून युद्धाला जाणाऱ्या रूपात कोरलेली असून त्यावर सुबक दागिने अन् यज्ञोपवित स्पष्ट दिसते.

Is Wai's Dholya Ganpati Idol Shrinking?

|

sakal 

मूर्तीची उंची खरोखरच कमी होतेय का?

मूर्तीची उंची दरवर्षी कमी होत असल्याची आख्यायिका खोडून काढत, विश्वस्तांनी स्पष्ट केले की फक्त मुकुट गोलाकार केल्यामुळे उंची कमी झाल्याचा भास होतो.

Is Wai's Dholya Ganpati Idol Shrinking?

|

sakal 

नवसाला पावणारा बाप्पा

महाराष्ट्राचे हे आराध्य दैवत नवसाला पावणारे मानले जाते, जिथे भाविक आपला नवस पूर्ण करण्यासाठी नारळाचे तोरण बांधण्याची प्राचीन परंपरा पाळतात.

Is Wai's Dholya Ganpati Idol Shrinking?

|

sakal 

थायलंड ते जपान! परदेशात कशी होते बाप्पाची पूजा?

Ganesha Around The World

|

sakal 

आणखी वाचा