थायलंड ते जपान! परदेशात कशी होते बाप्पाची पूजा?

सकाळ डिजिटल टीम

सर्व समावेशक अन् लोकप्रिय लोकदैवत

जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन पूजले जाणारे गणपती बाप्पा केवळ भारतातच नव्हे, तर आशियातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या नावाने अन् रूपात पूजले जातात.

Ganesha Around The World

|

sakal 

थायलंडमधील 'फ्रा फिकानत'

थायलंडमध्ये गणपतीला 'फ्रा फिकानत' म्हटले जाते. तेथे बाप्पाला यश, समृद्धी आणि विघ्नहर्ता मानले जात असून चाचोएंगसाओ येथे बाप्पाची विशाल मूर्ती आहे.

Ganesha Around The World

|

sakal 

जपानमधील 'कांगितेन' रूप

जपानमधील बौद्ध परंपरेत गणपती बाप्पाची पूजा 'कांगितेन' किंवा 'शोटेन' नावाने केली जाते. तेथे आलिंगन दिलेल्या दोन हत्तींच्या रूपातील मूर्तीची विशेष परंपरा आहे.

Ganesha Around The World

|

sakal 

कंबोडिया

कंबोडियातील ऐतिहासिक 'अंगकोर वाट' येथील 'प्रसाद बक' हे मंदिर भगवान गणेशाला समर्पित असून तेथे इसवी सन ८०२ पूर्वीपासून पूजा केली जाते.

Ganesha Around The World

|

sakal 

सिंगापूरमधील 'विनायगर' मंदिर

सिंगापूरमध्ये तमिळ परंपरेनुसार बाप्पाला 'विनायगर' म्हटले जाते. तेथील श्री लायान सिथी आणि श्री सेनपागा विनायगर मंदिरात बाप्पा मुख्य दैवत म्हणून पूजला जातो.

Ganesha Around The World

|

sakal 

इंडोनेशिया

इंडोनेशियातील जावा बेटावर १४ व्या व १५ व्या शतकापासून तांत्रिक परंपरेत गणेशाची पूजा केली जाते. तेथे बाप्पाला ज्ञान अन् कलेचे प्रतीक मानतात.

Ganesha Around The World

|

sakal 

मॉरिशस

मॉरिशसमधील मुख्य धार्मिक सणांमध्ये 'गणेशोत्सव' समाविष्ट आहे. तेथे सप्टेंबर महिन्यात अधिकृत सुट्टी देऊन हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.

Ganesha Around The World

|

sakal 

म्यानमारमधील 'महापेइन्ने'

म्यानमारमध्ये संस्कृत 'महाविनायक' या शब्दावरून बाप्पाला 'महापेइन्ने' नाव पडले असून तेथील प्राचीन परंपरेनुसार त्यांना विशेष स्थान दिले गेले आहे.

Ganesha Around The World

|

sakal 

चीन

आधुनिक सीमा बनण्यापूर्वीच बाप्पाने चीनमध्ये प्रवेश केला होता. तेथे उत्तर भागात 'कांगितेन' नावाने इसवी सन ५३१ मधील प्राचीन मूर्ती आढळते.

Ganesha Around The World

|

sakal 

आशिया खंडात पसरलेला गणेशोत्सव

भारत ओलांडून तिबेट, चीन, जपान आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये बाप्पाचा हा अनोखा सांस्कृतिक अन् धार्मिक प्रवास आजही अविरत सुरू आहे.

Ganesha Around The World

|

sakal 

कोणत्या आहेत जगातील ८ सर्वात जास्त सुंदर अन् रंगीबेरंगी इमारती?

World's Most Colorful Buildings

|

sakal 

आणखी वाचा