Pranali Kodre
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील धोपेश्वर या छोट्या गावात धूतपापेश्वर हे अतिशय पुरातन आणि सुंदर शिवमंदिर आहे.
Dhootpapeshwar Temple, Ratnagiri
X/maha_tourism
पाप धुऊन काढणारा ईश्वर म्हणून 'धूतपापेश्वर' असं त्याला म्हटलं जातं, अशी आख्यायिका आहे. महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते.
Dhootpapeshwar Temple, Ratnagiri
X/maha_tourism
प्रशस्त सभामंडप, अंतगृह, गर्भगृग अशी रचना असलेलं हे मंदिर अतिशय थंड आहे. मंदिर कलाकुसरीने सजलेलं आहे.
Dhootpapeshwar Temple, Ratnagiri
X/maha_tourism
निसर्गाने भरभरून दान दिलेलं हे ठिकाण असून मंदिराच्या परिसरात गर्द झाडी आहेत. त्यामुळे वातावरण थंड असते.
Dhootpapeshwar Temple, Ratnagiri
X/maha_tourism
धूतपापेश्वर मंदिराशेजारीच मृडा नदीचा प्रवाह प्रचंड मोठ्या कातळावरून खाली कोसळतो, त्यामुळे त्याला धबधब्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
Dhootpapeshwar Temple, Ratnagiri
X/maha_tourism
पावसाळ्यात येथील निसर्ग पाहण्यासारखा असतो, पण धबधब्याखाली डोह असल्याने पर्यटकांनी अतिउत्साह टाळावा.
Dhootpapeshwar Temple, Ratnagiri
X/maha_tourism
धूतपापेश्वर जवळच आंबोळगड किल्ला, राजापूरची गंगा, चुनाकोळवण धबधबा अशी काही पर्यटनाची ठिकाणंही आहेत.
Dhootpapeshwar Temple, Ratnagiri
X/maha_tourism
राजापूरची गंगा ज्यावेळी प्रगट होते, त्यावेळी उन्हाळे येथे गरम पाण्याच्या प्रवाहात स्थान केल्यानंतर गंगास्नान करतात आणि मग धूतपापेश्वरच्या दर्शनाला येतात. यामुळे काशीविश्वेश्वराचे दर्शन पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
Dhootpapeshwar Temple, Ratnagiri
X/maha_tourism
राजापूर येथे पर्यटकांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था होऊ शकते. राजापूरपासून ५ ते ७ किमी अंतरावर धूतपापेश्वर हे ठिकाण लागते. त्यासाठी राजापूरहून वाहणाची व्यवस्था होऊ शकते.
Dhootpapeshwar Temple, Ratnagiri
X/maha_tourism
राजापूरला रेल्वेस्थानक आणि बसस्थानकही आहे. त्यामुळे रेल्वे किंवा बसने राजापूरला पोहचता येते.
Rajapur Railway Station.
Sakal
Mandwa Beach
Sakal