Pranali Kodre
मुंबईपासून पाऊणतासाच्या अंतरावर मांडवा किनारा आहे. सुट्टीच्यादिवशी हे बंदर पर्यटकांनी फुलून जाते.
Mandwa Beach
Sakal
मांडवा बंदराहून फेरी बोट सुरू झाल्यापासून या ठिकाणाला अधिकच महत्त्व प्राप्त झाले. नैसर्गिक सृष्टीसौंदर्याचे वरदान लाभल्यामुळे हे आगळेवेगळे पर्यटनस्थळ झाले आहे.
Mandwa Beach
Sakal
मांडवा समुद्रकिनारी अनेक सेलिब्रेटींचेही बंगले आहेत, यात सिने कलाकार, क्रिकेटपटू, उद्योगपती, आदींचा समावेश आहे.
Mandwa Beach
Sakal
येथे अनेक मोठी दुकानं आहेत. तसेच येथे फिरण्यासाठी पर्यटकांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. लहान मुलांना खेळण्याचीही सोय आहे.
Mandwa Beach
Sakal
रो-रो सेवाही मांडवा येथून सुरू आहे. या बोटीतून बसेस, कार, दुचाकी वाहनांसह पर्यटकांची ने-आण केली जाते.
Mandwa Beach
Sakal
समुद्रकिनारी निवांतपणे बसण्याची सोय असल्याने बच्चेकंपनींसह जेष्ठ नागरिकांनाही दिलासा देणारे हे पर्यटनस्थळ आहे.
Mandwa Beach
Sakal
गेट वे ऑफ इंडियापासून साधारण तासाभरात मांडव्याला पोहचता येते. खासगी कंपनीच्या स्पीड बोटीने अधिक लवकर पोहचता येते.
Gateway of Way
Sakal
बंदरापासून काही अंतरावर मांडवा गाव असून कुस्तीगिरांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. उधाणाच्यावेळी मात्र बंदरावर प्रवेश बंद असतो.
Mandwa Beach
Sakal
Vengurla, Sindhudurg
Sakal