Pranali Kodre
भारत आणि इंग्लंड संघात नुकताच लॉर्ड्समध्ये १० ते १४ जुलै दरम्यान कसोटी सामना पार पडला.
या सामन्यात ध्रुव जुरेलला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. त्यामुळे तो बाहेर डगआऊटमधये बसला होता.
यावेळी त्याने त्याच्या एका कृतीने अनेकांची मनं जिंकली असून त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला.
मैदानाच्या जवळ असलेल्या एका चाहत्याने त्याच्याकडे पाण्याची मागणी केली.
त्यावेळी जुरेलने त्याची मागणी ऐकूण फार विचार न करता त्याच्याजवळ असलेल्या पाण्याच्या बॉक्समधील बाटली काढून त्या चाहत्याच्या दिशेने फेकली.
जुरेलने दाखवलेल्या या उदारतेचे अनेकांनी कौतुक केले आहे.
दरम्यान, जुरेल जरी या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नसला, तरी त्याने या सामन्यात रिषभ पंत दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्या जागेवर बदली यष्टीरक्षक म्हणून दोन्ही डावात यष्टीरक्षण केले.