Pranali Kodre
इंग्लंडचा माजी कर्णधार जॉस बटलरने लँकेशायरकडून व्हिटॅलिटी ब्लास्ट या इंग्लंडमधील देशांतर्गत टी२० स्पर्धेत खेळताना नुकताच टी२० कारकिर्दीत १३ हजारांचा टप्पा पार केला.
बटलर टी२० क्रिकेटमध्ये १३ हजार धावा पूर्ण करणारा जगातील सातवा, तर इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला.
बटलरपूर्वी टी२० क्रिकेटमध्ये १३ हजार धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊ. (आकडेवारी १९ जुलै २०२५ पर्यंत)
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या क्रमांकावर असून त्याने ४१६ टी२० सामन्यांत १३३९५ धावा केल्या आहेत.
विराट कोहली टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू असून त्याने ४१४ टी२० सामन्यांमध्ये १३५४३ धावा केल्या आहेत.
शोएब मलिकने ५५७ टी२० सामन्यांमध्ये १३५७१ धावा केल्या असून तो टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये चौथ्या क्रमांकवर आहे.
इंग्लंडचा ऍलेक्स हेल्स टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने ५०३ टी२० सामन्यांमध्ये १३८१४ धावा केल्या आहेत.
कायरन पोलार्डने ७०७ टी२० सामने खेळले असून १३८५४ धावा केल्या असून टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसर्या क्रमांकावर आहे.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याने ४६३ टी२० सामन्यांमध्ये १४५६२ धावा केल्या आहेत.