सकाळ डिजिटल टीम
फार कमी वेळेत बॉलिवूडवर आपली छाप सोडणाऱ्या ध्वनी भानुशालीचा आज वाढदिवस आहे. 22 मार्च 1998 मध्ये मुंबईत जन्मलेल्या ध्वनीबद्दल खास गोष्टी जाणून घेऊया.
ध्वनीने मुंबई विद्यापीठातून कॉमर्समध्ये पदवी घेतली आहे. तसेच तिने बिझनेस मॅनेजमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
ध्वनी ने 2017 तिची कारकीर्द सुरू केली. 'बद्रीनाथ की दुल्हनिया'मधील 'हमसफर' या गाण्याचे फिमेल व्हर्जन तिने गायले आहे.
ध्वनी भानुशालीच्या 'ले जा रे' आणि 'वास्ते' या गाण्यांना यूट्यूबवर एक अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी ही कामगिरी करणारी भानुशाली पहिली भारतीय तरुण गायिका आहे.
ध्वनी भानुशालीने 'वेलकम टू न्यूयॉर्क', 'वीरे दी वेडिंग', 'सत्यमेव जयते', 'लुका छुपी' आणि 'मरजावान' या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.
ध्वनीचे 'वास्ते' हे गाणे यूट्यूबवरील सर्वाधिक लाईक्स मिळालेल्या टॉप 100 म्युझिक व्हिडिओंच्या यादीत समाविष्ट आहे.
ध्वनीचे वडील विनोद हे सर्वात मोठ्या संगीत कंपनी टी-सीरीजचे ग्लोबल मार्केटिंग आणि मीडिया प्रकाशनचे अध्यक्ष आहेत.