Aarti Badade
रक्तातील साखरेची पातळी जर ७० mg/dL पेक्षा खाली गेली, तर त्याला 'हायपोग्लायसीमिया' म्हणतात. हे आरोग्यासाठी अत्यंत गंभीर लक्षण आहे.
Low blood sugar symptoms Diabetes and Fasting
sakal
अनेक लोक रात्रीचे जेवण करत नाहीत. यामुळे शरीराला पुरेसे कार्बोहायड्रेट्स मिळत नाहीत आणि सकाळी रक्तातील साखर अचानक कमी होते.
Low blood sugar symptoms Diabetes and Fasting
sakal
यकृत शरीरात ग्लुकोज साठवण्याचे काम करते. जर यकृत नीट कार्य करत नसेल, तर उपवास करताना किंवा सकाळी साखर कमी होण्याची शक्यता असते.
Low blood sugar symptoms Diabetes and Fasting
sakal
सकाळी उठल्यावर काहीही न खाता जड व्यायाम केल्याने साखरेची पातळी वेगाने खाली येते, ज्यामुळे भोवळ येण्याचा किंवा चक्कर येण्याचा धोका असतो.
Low blood sugar symptoms Diabetes and Fasting
Sakal
मधुमेह असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कडक उपवास करू नये. यामुळे हायपोग्लायसीमिया होऊन प्रकृती गंभीर होऊ शकते.
Low blood sugar symptoms Diabetes and Fasting
sakal
मधुमेहाच्या औषधांचा किंवा इन्सुलिनचा डोस स्वतःच्या मनाने कमी-जास्त करणे धोकादायक आहे. औषधांच्या असंतुलनामुळे साखर खालावू शकते.
Low blood sugar symptoms Diabetes and Fasting
sakal
साखर नियंत्रित ठेवण्यासाठी पांढरा भात, मैदा आणि गोड पदार्थ टाळावेत. त्याऐवजी कडधान्ये, हिरव्या भाज्या आणि फायबरयुक्त फळांचा समावेश करावा.
Low blood sugar symptoms Diabetes and Fasting
sakal
अचानक घाम येणे, थरथरणे, चक्कर येणे, खूप भूक लागणे किंवा चिडचिड होणे ही साखर कमी झाल्याची प्राथमिक लक्षणे आहेत.
Low blood sugar symptoms Diabetes and Fasting
Sakal
जर साखर कमी झाल्याचे जाणवले, तर त्वरित अर्धा ग्लास फळांचा रस किंवा ग्लुकोजचे पाणी प्यावे आणि डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Low blood sugar symptoms Diabetes and Fasting
Sakal
नियमित ३०-४५ मिनिटे व्यायाम, पुरेशी झोप, तणावमुक्ती आणि भरपूर पाणी पिणे यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.
Low blood sugar symptoms Diabetes and Fasting
Sakal
Side effects of eating too much non-veg
Sakal