Saisimran Ghashi
फक्त साखर कमी खाल्लं म्हणजे डायबिटीस होणारच नाही असं नाही.
मधुमेह होण्यामागे तुमच्या अनेक चुका कारणीभूत ठरतात
रोजच्या जीवनात पुरेशी शारीरिक हालचाल न झाल्यास शरीरातील इन्सुलिन योग्य प्रकारे कार्य करत नाही, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.
सततचा ताण-तणाव
मानसिक तणावामुळे शरीरात कॉर्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं, जे इन्सुलिनच्या कार्यात अडथळा आणू शकतं. दीर्घकाळ ताण घेतल्याने डायबेटीसचा धोका वाढतो.
चुकीचे आहारतत्त्व
जरी तुम्ही साखर कमी घेत असाल, तरीही जर आहारात फायबर कमी आणि प्रोसेस्ड फूड्स, ट्रान्स फॅट, जास्त मीठ यांचा समावेश असेल, तर त्यामुळेही रक्तातील साखरेवर परिणाम होतो.
झोपेची अनियमितता
कमी झोप किंवा अनियमित झोपेमुळे शरीराचं मेटाबॉलिझम बिघडतं आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते, ज्यामुळे डायबेटीस होण्याचा धोका वाढतो.
कौटुंबिक इतिहास किंवा जनुकीय कारणं (Genetic or Family History)
कधी कधी तुमचा आहार आणि जीवनशैली व्यवस्थित असूनही जर घरात आधीपासून डायबेटीस असलेले लोक असतील, तर तुम्हालाही तो होण्याची शक्यता वाढते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.