Bitter Gourd Juice : मधुमेही रुग्णांनी दररोज कारल्याचा रस प्यावा का? आरोग्यावर काय परिणाम होईल?

सकाळ डिजिटल टीम

कारल्याचा रस आरोग्यदायी आहे का?

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारा आणि पाण्याची गरज भागवणारा कारल्याचा रस अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी युक्त आहे. मात्र, मधुमेहाच्या रुग्णांसाठी रोजच्या आहारात कारल्याचा रस समाविष्ट करणे योग्य आहे का?

Bitter Gourd Juice Benefits

मधुमेही रुग्ण कारल्याचा रस पिऊ शकतात का?

हो, मधुमेही रुग्ण कारल्याचा रस प्रमाणात पिऊ शकतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी तात्पुरती कमी होऊ शकते. मात्र, हा रस डॉक्टरांनी दिलेल्या औषधांऐवजी कधीही वापरू नये.

Bitter Gourd Juice Benefits

रस केव्हा प्यावा?

कारल्याचा रस सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास चांगला परिणाम होतो. यामुळे दिवसभर रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.

Bitter Gourd Juice Benefits

आरोग्यदायी फायदे

  • इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतो.

  • पचनक्रिया सुधारतो.

  • यकृताचे कार्य बळकट करतो.

  • रक्तातील साखरेची पातळी कमी करतो.

  • वजन कमी करण्यास सहाय्यक ठरतो.

Bitter Gourd Juice Benefits

संभाव्य दुष्परिणाम

  • अतिप्रमाणात कारल्याचा रस घेतल्यास हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखर अत्यंत कमी होणे) होऊ शकतो.

  • काही जणांना पोट बिघडणे किंवा अपचन होण्याचा त्रास होऊ शकतो.

  • गर्भवती महिलांनी कारल्याचा रस घेणे टाळावे.

  • याची चव खूप कडू असल्याने काही जणांना पिणे कठीण वाटू शकते.

Bitter Gourd Juice Benefits

चव सुधारण्यासाठी नैसर्गिक पर्याय

कारल्याच्या रसाची कडवट चव सौम्य करण्यासाठी खालील पदार्थ वापरू शकता..

  • लिंबाचा रस

  • आलं

  • पुदिना

  • काकडी

  • काळं मीठ

Bitter Gourd Juice

मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती फळं खावीत? Diabetic Diet साठी योग्य फळं कोणती?

Best Fruits for Diabetic Patients | esakal
येथे क्लिक करा