सकाळ डिजिटल टीम
मधुमेह असलेल्यांनी आपल्या आहाराकडे अधिक सतर्कतेने लक्ष देणे आवश्यक असते. विशेषतः फळांचा समावेश करताना योग्य निवड केली, तर ते आरोग्यासाठी वरदान ठरू शकते.
अनेक वेळा रुग्ण हे ठरवण्यात गोंधळतात की, कोणती फळे त्यांच्या साखरेवर परिणाम न करता फायदेशीर ठरू शकतात. खाली अशा काही फळांची माहिती दिलीये, जी मधुमेहाच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतात.
किवीचे ग्लायसेमिक इंडेक्स (GI) अत्यल्प असते, त्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्सनी समृद्ध, हे फळ मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी एक उत्तम पर्याय आहे.
सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, म्हणूनच हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते.
पपईमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन B आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. हे पचनसंस्थेस मदत करते आणि साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास सहायक ठरते.
आडूमध्ये व्हिटॅमिन A, C, पोटॅशियम आणि फायबर यांचा समावेश असतो, जे मधुमेह असलेल्या व्यक्तींना चांगले पोषण देतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
ही फळे मर्यादित प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करावीत. कोणताही आहारात बदल करताना वैद्यकीय मार्गदर्शन आवश्यक आहे.