Monika Shinde
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता आणि उष्णतेचा परिणाम मधुमेह रुग्णांवर अधिक होतो. त्यामुळे या काळात योग्य आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
काही पदार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवतात आणि त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. चला पाहूया कोणते पदार्थ टाळायला हवेत.
कोल्ड ड्रिंक्स, बॉटलमधील फळांचे रस आणि फ्लेवर्ड पाण्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. हे पेये त्वरीत रक्तातील साखरेची पातळी वाढवतात.
केळी, आंबा, चिकू आणि द्राक्षे यांसारख्या फळांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. मधुमेह रुग्णांनी ही फळे कमी प्रमाणात किंवा वैद्यकीय सल्ल्यानुसार खावी.
सामोसे, भजी, वडे, फरसाण यांसारख्या तळलेल्या पदार्थांमध्ये चरबी आणि कॅलोरी जास्त असते. हे पदार्थ शरीराचे वजन वाढवतात आणि इन्सुलिन प्रतिकार वाढवू शकतात.
चिप्स, बिस्किट्स, इंस्टंट नूडल्स आणि फ्रोजन फूडमध्ये लपवलेली साखर व मीठ जास्त प्रमाणात असते. हे पदार्थ मधुमेह नियंत्रणात अडथळा निर्माण करतात.
रसगुल्ला, गुलाबजाम, केक, आइस्क्रीम यांसारख्या गोड पदार्थांमध्ये साखर, क्रीम आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. हे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढवतात.
कोरड्या फळांऐवजी ताज्या, कमी गोड फळांचा वापर करा (उदा. सफरचंद, पपई, काळी मैना, जांभूळ)