फास्ट फूडला रामराम! आता खा हे चविष्ट आणि हेल्दी स्नॅक्स

Monika Shinde

फास्ट फूड

फास्ट फूडने तुमचं आरोग्य बिघडवतंय? वेळ आली आहे त्याला "रामराम" म्हणायची! तुमच्यासाठी घेऊन आलोय टेस्टी, हेल्दी आणि घरच्या घरी बनवता येणारे स्मार्ट स्नॅक्स.

Fast Food | Esakal

पोह्यांची चटपटीत भेळ

कांदे, टोमॅटो, फरसाण आणि थोडा लिंबू टाकून तयार करा हलकं पण पोटभर स्नॅक. अगदी मिनिटांत तयार होणारा पर्याय!

Spicy bhel | Esakal

मिक्स स्प्राऊट्स उसळ

मोड आलेले हरभरे, मूग यांची थोडीशी फोडणी, हिरवी मिरची, लिंबू आणि कोथिंबीर. प्रोटीन आणि चव दोन्ही एकत्र!

Mix Sprouts Usal | Esakal

उकडलेलं स्वीट पोटॅटो (राताळं)

उकडलेलं राताळं, मसाला आणि थोडं चपातीसोबत रोल करा. एकदम टेस्टी आणि डायजेस्ट होणारं हेल्दी स्नॅक.

Sweet potato roll | Esakal

मखाणे आणि शेंगदाणे

थोडं तूप, हळद, मिरी आणि मीठ टाकून कुरकुरीत बनवा. ऑफिस किंवा स्कूल साठी परफेक्ट!

Makhana nd peanuts | Esakal

ओट्स उत्तप्पा किंवा ओट्सची धिरडी

फायबरने भरलेला हा पर्याय वजन कमी करणाऱ्यांसाठी योग्य. ताकातले ओट्स भिजवून थोड्या भाज्या मिसळून तयार करा.Fruit chaat

Oats Utthappa or Oats Dhirdi | Esakal

फळांची चाट

स्ट्रॉबेरी, सफरचंद, डाळिंब यांचं मिश्रण आणि त्यावर मध-लिंबाचा टच. टेस्ट देखील आणि हेल्थ देखील!

Fruit chaat | Esakal

स्प्राऊट्सची कोशिंबीर

हरभरे, मूग, कांदा, टोमॅटो, लिंबू आणि कोथिंबीर. प्रोटीन आणि चव यांचा परिपूर्ण संगम.

Sprouts salad | Esakal

जेवणाआधी हात धुणं का आहे आरोग्यासाठी गरजेचं? जाणून घ्या कारणं

येथे क्लिक करा