Varsha Balhe
पृथ्वीवर पाऊस पडला की पाणी बरसतं, पण अंतराळातील काही ग्रहांवर चक्क हिऱ्यांचा पाऊस पडत असावा, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
DIAMOND RAIN ON URANUS AND NEPTUNE
esakal
युरेनस आणि नेपच्यून हे सौरमालेतील दोन ग्रह आहेत. या ग्रहांच्या आतल्या भागात प्रचंड दाबामुळे हिरे तयार होत असावेत, असं संशोधनातून समोर आलं आहे.
DIAMOND RAIN ON URANUS AND NEPTUNE
esakal
या ग्रहांवर मिथेन नावाचा वायू आहे. त्यातील कार्बनवर प्रचंड दाब आणि उष्णतेचा परिणाम होतो. त्यामुळे कार्बनचे अणू एकत्र येऊन हिऱ्यांसारखी रचना तयार होऊ शकते.
DIAMOND RAIN ON URANUS AND NEPTUNE
esakal
युरेनस आणि नेपच्यूनच्या आतल्या भागात दाब खूप जास्त असतो. या परिस्थितीत कार्बनचे रूपांतर हिऱ्यांमध्ये होऊ शकतं, असं प्रयोगांमधून दिसून आलं आहे.
DIAMOND RAIN ON URANUS AND NEPTUNE
esakal
हे हिरे तयार झाल्यानंतर ग्रहाच्या आतल्या भागाकडे खाली जात असावेत. या प्रक्रियेला ‘हिऱ्यांचा पाऊस’ असं म्हटलं जातं.
DIAMOND RAIN ON URANUS AND NEPTUNE
esakal
हा पाऊस पृथ्वीवर ढगांतून पाणी पडतं तसा नसतो. ग्रहांच्या खोल भागात प्रचंड दाबाखाली ही प्रक्रिया घडत असावी, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
DIAMOND RAIN ON URANUS AND NEPTUNE
esakal
सध्या तरी हे शक्य नाही. युरेनस आणि नेपच्यून हे पृथ्वीपासून खूप दूर आहेत. तसंच, त्यांच्या आतल्या भागातील प्रचंड दाब आणि तापमानामुळे तिथे पोहोचून हिरे गोळा करणं अत्यंत कठीण आहे.
DIAMOND RAIN ON URANUS AND NEPTUNE
esakal
युरेनस आणि नेपच्यूनवर हिऱ्यांचा पाऊस पडत असल्याची शक्यता शास्त्रज्ञांच्या संशोधनातून समोर आली आहे. मात्र, ही प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिलेली नसून तिचा अभ्यास प्रयोग आणि वैज्ञानिक मॉडेलच्या मदतीने केला जात आहे.
DIAMOND RAIN ON URANUS AND NEPTUNE
esakal
WHY DO LEOPARDS CARRY THEIR PREY UP TREES?
esakal