बोनसची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच झाली का?

सकाळ वृत्तसेवा

व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेज

दिवाळी सुरू झाली आणि सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला, "बाबासाहेब आंबेडकरांमुळेच बोनस मिळायला सुरुवात झाली" या दाव्याचं सत्य काय आहे? चला, पाहूया…

Dr. Babasaheb Ambedkar |

esakal

मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय?

मेसेजनुसार, बाबासाहेबांनी सरकारला पत्र लिहून 13 वा पगार, म्हणजेच ‘बोनस’ सुरू केला.
30 जून 1940 रोजी कायदा लागू झाला, असं त्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. पण हा ऐतिहासिक दावा खरा आहे का?

Dr. Babasaheb Ambedkar |

esakal

बाबासाहेब आणि कामगार चळवळ

बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त सामाजिक सुधारणाच नाही, तर कामगारांच्या हक्कांसाठीही लढा दिला. 1936 साली त्यांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन केला. या पक्षाने गिरणी कामगार, शेतमजूर, महिला कामगार यांचे प्रश्न मांडले.

​​Dr Babasaheb Ambedkar

| esakal

स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा

जाहीरनाम्यात कामगारांच्या हितासाठी मोठ्या मागण्या होत्या. योग्य वेतन, भरपगारी रजा, बोनस, विमा योजना, निवास व्यवस्था, हे सर्व कायद्याने मिळावे, अशी मागणी बाबासाहेबांनी केली होती.

​​Dr Babasaheb Ambedkar

| esakal

1938 चा ऐतिहासिक संप आणि संघर्ष

15 सप्टेंबर 1938 रोजी ‘ट्रेड डिस्प्युट बिल’वर बाबासाहेबांनी जोरदार भाष्य केले. 7 नोव्हेंबर 1938 रोजी गिरणी कामगारांनी एकदिवसीय संप केला, आणि कामगार संघटनांचा आवाज बुलंद झाला.

​​Dr Babasaheb Ambedkar

| esakal

बाबासाहेब मजूरमंत्री झाले तेव्हा

या लढ्याच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात ‘मजूरमंत्री’ झाले. त्यांनी स्त्री कामगारांसाठी प्रसूती रजा व समान वेतनाचा हक्क दिला.

​​Dr Babasaheb Ambedkar

| esakal

बोनसची संकल्पना कशी आली?

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात महागाई वाढली, कामगारांना जीवननिर्वाहासाठी अधिक हक्क द्यावे लागतील, ही जाणीव बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झाली. ‘उत्पादनातील नफ्यात कामगारांचाही हिस्सा असावा’ ही कल्पना ‘बोनस’ म्हणून पुढे आली.

Dr. Babasaheb Ambedkar

|

esakal

‘जनरल मोटर्स’ केस आणि न्यायालयाचा निर्णय

1944 मध्ये मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश एम.सी. छगला यांनी निर्णय दिला की,
“उद्योगसंस्थेला नफा झाला तर कामगारांचाही त्यात हिस्सा असावा.” याने बोनसची कायदेशीर पायाभरणी झाली.

​​Dr Babasaheb Ambedkar

|

esakal

बाबासाहेबांचा वाटा

‘कामगारांना बोनससारखा हक्क मिळावा’ हा विचार, लढा आणि पाया हा नक्कीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच घातला, म्हणूनच बोनसच्या संकल्पनेमागे बाबासाहेबांचा विचार आहे.

Dr. Babasaheb Ambedkar |

esakal

दिवाळीसाठी फेमस असणाऱ्या सोन पापडीचा शोध कुणी आणि कसा केला?

Soan Papdi

|

ESakal

येथे क्लिक करा